Ratnagiri Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग, 19 प्रवासी थोडक्यात बचावले

Mumabi-Goa Highway Bus Fire : रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खाजगी बसने महाड जवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला. ही घटना महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर घडली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 7, 2024, 10:21 AM IST
Ratnagiri Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग, 19 प्रवासी थोडक्यात बचावले title=

Ratnagiri Bus Fire News Marathi : महाडमधील सावित्री नदी पुलावरची दुर्घटनेची आठवणी आजही स्मरणात आहे. सावित्री नदी म्हटलं तरी ती दुर्घटना आठवते. अशातच बुधवारी मध्यरात्री रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक पेट घेतला. या खासगी बसमध्ये सर्वजन गाढ झोपले असताना मध्यरात्री बसच्या टायरने अचानक पेट घेतला. यानंतर पुढील काही क्षणातच बस आगीच्या भक्षस्थानी गेली. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस संपूर्ण जळून खाक झाली. 

मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी (7 फेब्रुवारी) मध्यरात्री 1.45 वाजता बसमध्ये सर्वजण गाढ झोपले असताना बसला अचानक आग लागली. धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. बसला आग लागली त्यावेळी बसने एकूण 19 प्रवासी प्रवास करत होते. तरुणांच्या प्रसंगावधामुळे बसमधील प्रवासी सुखरुप बचावले आहेत. बसच्या टायरला आग लागल्याचे तरुणाच्या लक्षात आले आणि त्यांनी खबरदारी घेतल्याने बसमधील इतर प्रवाशांचे प्राण वाचले. हा तरुण मुंबईत शिक्षण घेणाऱ्या आर्यन भाटकर या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याने दाखवलेल्या  प्रसगांवधानामुळे बसमधील 19 प्रवासी , दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनरचा जीव वाचला.  

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात अग्निशमन दलाने आग विझवण्यास सुरुवात केली.  मात्र ही बस जळून खाक झाली आहे.  या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. 

या घटनेला 8 वर्ष पूर्ण 

मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेत 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला आठ वर्ष पूर्ण झाली तरी या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. हा दिवस कोकणवासियांसाठी काळा दिवस ठरला. याच रात्री मुसळधार पावसामुळे सावित्री नदीनं रौद्र रुप धारण केलं होतं आणि त्यामुळे सावित्री नदीवर असणारा मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेला होता. यात जवळपास 40 जणांना जलसमाधी मिळाली होती. तब्बल 13 दिवसांच्या शोधकार्यानंतर वाहनांच्या सांगाड्यासह 30 जणांचे मृतदेह हाती लागले. हा पूल अवघ्या 165 दिवसात नवीन पूल उभारुन वाहतुकीसाठी खुलादेखील करण्यात आला.