नागपूर : नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला पहाटेचं सुरुवात झालीय. संघ स्वयंसेवकांनी शहरात घोषवाद्यासह पथसंचलन केलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पथसंचलानाचं निरीक्षण केलं. यावेळी विजयादशमी उत्सवाला नोबेल पारितोषक विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. पथसंचलनाच्या निरीक्षणाच्या वेळी तेही उपस्थित होते. त्यानंतर रेशीमबागेत पारंपरिक पद्धतीनं शस्त्रपूजन करण्यात आलं. सरसंघचालक विजयादशमीच्या निमित्तानं आपले विचार मांडत आहेत.
नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थींनी यावेळी संघानं कार्यक्रमला बोलावल्याबद्दल आभार व्यक्त केले.
त्यानंतर देशातल्या आणि जगातल्या बाल कामगारांच्या वाचा फोडण्याच्या त्यांच्या कामाचा सुरुवातीपासूनचा प्रवास उलगडला.
जगभरात बालकामगारांचं प्रमाण कमी करण्यासाठी सध्या सुरु असलेल्या समाधान व्यक्त केलं.
पण आणखी बरचं काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
करुणेशिवाय समाजकारण, अर्थकारण हे सारं काही व्यर्थ असल्याचं मत यावेळी सत्यार्थींनी व्यक्त केलं.