बलात्कारी रेहान कुरेशीची गुन्ह्यांची कबुली

कुरेशीने सहा आणि नऊ वर्षांच्या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली होती.

Updated: Oct 16, 2018, 07:31 PM IST
बलात्कारी रेहान कुरेशीची गुन्ह्यांची कबुली title=

नवी मुंबई : कुख्यात नराधम बलात्कारी रेहान कुरेशी यानं आपल्या गुन्ह्यांची कबुली दिलीय. आतापर्यंत पोस्को कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलेल्या १९ गुन्ह्यांची कबुली त्यानं दिलीय, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिलीय. कुरेशी हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला अलिकडेच अटक करण्यात आलेय.

आठ वर्षांपूर्वी २०१० साली त्यानं कुर्ला नेहरूनगर इथं सहा आणि नऊ वर्षाच्या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली होती. डीएनए चाचणी केल्यानंतर कुरेशीची काळी कृत्यं उजेडात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

आठ वर्षांपूर्वीची ही घटना घडली आहे. २००५ पासून अशा अनेक गुन्ह्यांचा तपास आता पोलिस करतायत. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.