नाशकात अल्पवयीन मुलीवरील बलात्कार दडपण्याचा प्रकार

जिल्ह्यात राजावाडी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मात्र हा बलात्कार दडपण्याचा प्रयत्न चक्क ठाकूर समाजाच्या जात पंचायतीनेच केल्याचा आरोप करण्यात येतोय. 

Updated: Mar 7, 2018, 09:08 PM IST
नाशकात अल्पवयीन मुलीवरील बलात्कार दडपण्याचा प्रकार title=

नाशिक : जिल्ह्यात राजावाडी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मात्र हा बलात्कार दडपण्याचा प्रयत्न चक्क ठाकूर समाजाच्या जात पंचायतीनेच केल्याचा आरोप करण्यात येतोय. 

सुरुवातीला जातपंचायतीने आरोपीला गुन्हा कबूल करायला लावून पीडितेशी लग्न करण्यास सांगितलं. मात्र त्यानंतर 15 दिवसांनी चक्क पीडित कुटुंबाला वाळीत टाकत आरोपीला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. 

त्यामुळे पीडितेचे पालक सकाळपासून त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनवर ठाण मांडून आहेत. अखेर संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.