अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ३ जणांना फाशी

 लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ३ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Updated: Nov 10, 2017, 03:23 PM IST
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ३ जणांना फाशी title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ३ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 

अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर २२ ऑगस्ट २०१४ रोजी लोणीमावळा येथे अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे या आरोपींविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

उज्ज्वल निकम यांनी खटला चालवावा-अण्णा हजारे

हा खटला सरकारी वकील उज्वल निकम यांनी चालवावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केली होती. या तीनही आरोपींना ६ नोव्हेंबरला दोषी सिद्ध केले होते. आणि आज अहमदनगर च्या जिल्हा सत्र न्यायालयात तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.