धुळे : काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबरला साजरा होणार्या 'ब्लॅक-डे' ला आमचा विरोध असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तो दिवस 'व्हाईट मनी डे' म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत आज जाहीर केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितल्यानुसार, दर दहा वर्षांनी विमुद्रीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विमुद्रीकरणाला आमचा पाठींबाच आहे. यावेळी जीएसटीलाही त्यांनी समर्थन दर्शविले.
पंतप्रधान मोदी यांच्या कामामुळे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीचीही आम्हाला चिंता नाही, असेही ते यावेळी म्हणाले.