रामदास आठवलेंनी केले २०१९ चे भाकीत

  2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी  केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले भाकीत केले आहे. या निवडणुकीत दोन शक्यता आठवले यांनी व्यक्त केल्या आहेत. यात युती झाली तर आणि युती झाली नाही तर अशा दोन्ही शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या आहे. दौंड शहरात रविवारी राज्य राखीव पोलिस दलाच्या विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी हे भाकीत केले आहे. 

Updated: Mar 26, 2018, 04:24 PM IST
रामदास आठवलेंनी केले २०१९ चे भाकीत  title=

दौंड :  2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी  केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले भाकीत केले आहे. या निवडणुकीत दोन शक्यता आठवले यांनी व्यक्त केल्या आहेत. यात युती झाली तर आणि युती झाली नाही तर अशा दोन्ही शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या आहे. दौंड शहरात रविवारी राज्य राखीव पोलिस दलाच्या विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी हे भाकीत केले आहे. 

तर युतीला ४४ जागा... 

भाजप, शिवसेना व रिपाईं यांची युती झाल्यास राज्यातील ४८ पैकी ४४ जागा मिळतील. युतीमध्ये शिवसेना न राहिल्यास भाजप-रिपाईं युतीला २६ ते २८ जागा मिळतील आणि त्यामध्ये दोन जागा रिपाईंच्या असतील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.  यावेळी आमदार राहुल कुल यांच्यासह परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, विकास कदम, प्रकाश भालेराव, आदी या वेळी उपस्थित होते.

भाजपला देशात मिळतील इतक्या जागा...

रामदास आठवले म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी युवा पिढीत आकर्षण असून, ते मतदारांच्या मनावर प्रभाव पाडण्यात यशस्वी आहेत. जीएसटीमुळे व्यापारी खुश नाही परंतु तीन वेळा मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच काही केले जातील. तीन तलाक संबंधी कायद्यामुळे ४० टक्के मुस्लिम महिलांची मते भाजपला मिळतील. दलित समाज मोदींच्या पाठीशी आहे. नोटबंदीचा सकारात्मक परिणाम होईल. देशात सगळ्या गोष्टी आलबेल नाही परंतु, देशात एकदम विरोधी वातावरण नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप ३०० जागांच्या पुढे जाईल. काँग्रेस पक्षही मात्र १०० जागांच्या पुढे जाईल, अशी शक्यता नाही''. 

पवारांच्या पंतप्रधानपदावर आठवले म्हणाले...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, '' पवार पंतप्रधान झाले तर आनंद होईल परंतु नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत पवार पंतप्रधान होणे अशक्य आहे. तिसऱ्या आघाडीच्या आधारावर पवार पंतप्रधान होणार नाहीत, असे त्यांनी भाकीत व्यक्त केले आहे.  

उत्तर प्रदेशात मिळतील इतक्या जागा...

ते पुढे म्हणाले, ''उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकत्र आलेले समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येणार नाहीत. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा भाजपने राज्यसभा निवडणुकीत काढलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ५० जागा मिळतील.

रामनवमीची आठवण करून देताच हजरजबाबीपणाने रामदास आठवले यांनी 'नावात आहे राम, अॅट्रोसिटी कायद्याला सपोर्ट करणे माझे काम' ही कविताही सादर केली.