मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विटर अकाऊंट सुरु केले. एक खास ट्विट करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी लिहिले की, आज महाराष्ट्र दिन, आज मराठी माणसाला त्याचे राज्य मिळाले आणि मराठी भाषेला मान्यता मिळाली. या राज्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अपार कष्ट केले. आज त्याबद्दल विचार करण्याची गरज आहे आणि आपल्या जबाबदाऱ्या जाणून घेण्याचा दिवस आहे. जय महाराष्ट्र...
आज महाराष्ट्र दिन ! आज मराठी माणसाला त्याच्या हक्काचं राज्य मिळालं आणि एका अर्थानं मराठी भाषेला मान्यता मिळाली. हे राज्य मिळवण्यासाठी अनेका-अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस! जय महाराष्ट्र !
— Raj Thackeray (@RajThackeray) May 1, 2018
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएससी) प्रश्नप्रत्रिका लीक झाल्यानंतर पुन्हा परिक्षा घेतली जाणार होती. मात्र या परिक्षेला विद्यार्थ्यांनी बसू नये, त्यावर बहिष्कर टाकावा असे आवाहन विद्यार्थांना सांगितले. ही सरकारची जबाबदारी असून सरकाराने आपल्या चूकीचा स्वीकार करून पुन्हा परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे ओझे वाढवू नये, असेही ते म्हणाले.