Raj Thackeray : राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठे भाष्य

Raj Thackeray  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. (MNS President Raj Thackeray on a two-day visit to Pune) कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मनसेने लढवावी अशी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. 

Updated: Feb 5, 2023, 10:30 AM IST
Raj Thackeray : राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठे भाष्य title=
Raj Thackeray in Pune

Raj Thackeray in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. (MNS President Raj Thackeray on a two-day visit to Pune) कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मनसेने लढवावी अशी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. दरम्यान,  चिंचवड (Chinchwad by-election) आणि कसबा विधानसभा  (Kasba Peth by-election) पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा खुद्द राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी महाविकास आघाडीला आवाहन केले आहे. (Maharashtra Political News)

राज ठाकरे म्हणाले, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उमदेपणा भाजपने दाखवला आहे. आता कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीने  उमदेपणा दाखवावा. महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. 

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके याच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केले होते. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली, असे राज ठाकरे म्हणाले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मनसेने लढवावी अशी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. ही मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोहोचवलीय. त्यामुळे राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्याची शक्यता होती. मात्र, तसे काहीही झालेले नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक न लढण्याची आतापर्यंत मनसेची भूमिका आहे. मात्र, कसब्यातील जागेवर टिळक कुटुंबीय लढत नसल्याने त्या जागेसाठी राज ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी महाविकास आघाडीला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले आहे.