मुंबई : Rain in Maharashtra : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. (Rain Alert) वातावरणात झालेल्या बदलामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस पडेल. (Rain warning again in Maharashtra)
12 ते 14 नोव्हेंबर रोजी राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, पुणे सहीत मराठवाड्याचा दक्षिण भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
12 ते 14 नोव्हेंबर, राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता. कोकण (मोस्टली द. कोकण), द.
मध्य महाराष्ट्र, पुणे सहीत आणी मराठवाडा द. भाग प्रभावीत असण्याची शक्यता.
IMD@RMC_Mumbai pic.twitter.com/uAeMRAhHKu— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 10, 2021
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे. नागपूर आणि अकोला येथे पाऱ्यात मोठी घट झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे.
वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण (Rain in Maharashtra) झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा (Thunderstorm and lightning) इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे.