येत्या २४ तासांत मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात घट होणार आहे

Updated: Jun 25, 2018, 07:42 PM IST
येत्या २४ तासांत मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता  title=

मुंबई : येत्या २४ तासांत मुंबई ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय... तर ४८ तासांनंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. या काळात  ढगाळ वातावरणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात घट होणार आहे.

या आठवड्यात मध्य-भारतात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र २९ जून ते २ जुलै दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात पावसात खंड पडण्याची शक्यता असून त्यामुळं तपमानात वाढ होणार आहे. 

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी आणि लागवडीचे नियोजन करावं  असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या आठवड्यात मुंबईसह कोकणातही  चांगल्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.