कंटेनर काळ बनूनं आला...विचित्र अपघातात एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, 3 जणांचा मृत्यू

Updated: Jul 1, 2021, 06:34 PM IST
कंटेनर काळ बनूनं आला...विचित्र अपघातात एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू title=

प्रफुल्ल पवार झी मीडिया, रायगड: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार जळून खाक झाली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषम अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ बोरघाटात मुंबई लेनवर अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

कंटेनरने कारला मागून धडक दिल्याने कार पुढील ट्रकवर आदळली. या धडकेमध्ये कारमधील प्रवासी बाहेर फेकले गेले आणि कारने पेट घेतला. या विचित्र अपघातात एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना पनवेलजवळील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातामुळे 

मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर मुंबई लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. खोपोली पोलीस, महामार्गावरील वाहतूक पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या गृपचे सदस्य, देवदुतची टिम अपघातस्थळी दाखल होऊन तातडीने मदत केली. 

कंटेनर चालक यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. वाहतूक हळूहळू पूर्व पदावर येत आहे. या विचित्र अपघातामुळे काही वेळ वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.