BJP Protest : राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे आंदोलन, पुणे आणि मुंबईत जोरदार राडा

Rahul Gandhi on Savarkar : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केले. पुणे, मुंबई येथे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Updated: Nov 18, 2022, 12:51 PM IST
BJP Protest : राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे आंदोलन, पुणे आणि मुंबईत जोरदार राडा title=

BJP's protest against Rahul Gandhi : काँग्रेस नेते  खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केले. (Rahul Gandhi on Savarkar) यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सावरकर वादात भाजयुमो आक्रमक झाली.जोरदार घोषणाबाजी करत भाजयुमोची पुण्यात काँग्रेस भवनात घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. (BJP protest in Pune) तर मुंबईतही आंदोलन, नागपुरात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत पुणे मुंबईत भाजपकडून निषेध करण्यात आला. पुण्यातील काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आलं.. तसंच पुण्यातील काँग्रेस भवनात भाजपनं बॅनरबाजी केली. तर इकडे मुंबईतही राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपनं आंदोलन केलं. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्ते दादरमधील टिळक भवनाकडे जाणार होते. मात्र पोलिसांनी दादर फुल मार्केटजवळच या कार्यकर्त्यांना रोखलं. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली.

कर्वे रस्ता डेक्कन येथे आंदोलन 

पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक कर्वे रस्ता डेक्कन येथे आंदोलन करण्यात आले. तर वीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात नागपुरात भाजयुमोकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईत कुर्ला येथे शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी आंदोलन केले.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे दादर फुल मार्केटसमोर आंदोलन करण्यात आले.  दादर फुल मार्केट इथून टिळक भवनकडे जाण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

 भाजप युवा मोर्चाकडून यावेळी जोरदार निषेध

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाकडून यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. आम्ही सावरकरांचा अपमान कधीही सहन कराणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध वारंवार बालीश विधाने करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. त्यांचा जाहीर निषेध करत आहोत, असे भाजप युवा मोर्चाने म्हटलेय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे कसले भारत जोडो हे तर वैचारिक भारत तोडू असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला होता. जय वीर सावरकर असा बॅनर घेऊन आंदोलन करण्यात येत होते.  यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात येत आहे. यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. 

वीर सावरकरांचा वादग्रस्त वक्तव्य करणारे राहुल गांधी यांच्या विरोधात नागपुरात भाजयुमोकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.  गणेशपेठ पोलीस स्टेशनला राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याकरिता तक्रार ही तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार कृष्ण खोपडे, शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली.