कोल्हापूर पालिका सभागृहात सत्ताधारी-विरोधकांत राडा

महापालिकेच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे पालिकेत तणावपूर्ण वातावरण होते.

Updated: Jun 20, 2017, 03:37 PM IST

कोल्हापूर : महापालिकेच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे पालिकेत तणावपूर्ण वातावरण होते. रस्ते हस्तांतरण विषयावरुन कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. एकमेकांच्या आंगावर धाऊन जाण्याचा प्रयत्न झाला. यावेळी नगरसेवक एका मेकाला भिडलेत.

रस्ते हस्तांतरणाच्या ठरावावरून दोन्ही गटाचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून आले. त्यामुळे भर सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. या गोंधळामुळं सभा अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आली. 

हा गोंधळ सुरु असतानाच महापौर फरास सभेतून उठून गेल्या. तर दुसरीकडे रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर झाल्यास कोल्हापूरच्या महापौर फरास यांना काळं फासू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.