तासगावात पालिका पोटनिवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत राडा

तासगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणूक प्रचारावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. तलवार, रिव्हॉल्व्हर, काठ्या, गज यांचा हाणामारीत वापर करण्यात आला.

Surendra Gangan Updated: Apr 4, 2018, 03:31 PM IST
तासगावात पालिका पोटनिवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत राडा title=

सांगली : तासगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणूक प्रचारावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. तलवार, रिव्हॉल्व्हर, काठ्या, गज यांचा हाणामारीत वापर करण्यात आला.

राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी पवार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यावेळी पाच पोलिस गंभीर जखमी झाले.  पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून १०३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील, तर राष्ट्रवादीचे लखन पवार, दिनेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. 

तर याप्रकरणी तासगाव पोलिसांनी भाजपच्या तीन नगरसेवकांसह आणि १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आज तासगाव मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आपापल्या मागण्यासाठी आंदोलन करणार आहेत.