कोल्हापूर : आज राज्यातल्या विविध भागांमध्ये जोरदार हाणामारीच्या घटना झाल्या आहेत. धुळ्यात शिवसेनेत राडा झालाय. तसेच कोकणातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीत भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. तर कोल्हापुरात शिरोळच्या साखर कारखान्यात शेतकऱ्यानी प्रकल्पाला विरोध केल्यानं हाणामारीची घटना घडलीय.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळच्या टाकळीवाडी इथल्या दत्त शुगर साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत राडा झालाय. डिस्टीलरी प्रकल्प उभारण्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं. त्यानंतर या सभेत मोठा राडा झाला.
डिस्टीलरी प्रकल्प शेतीला नुकसानग्रस्त असल्यामुळे हा प्रकल्प होऊ नये असा मुद्दा शेतकऱ्यांनी रेटला. मात्र त्यानंतर वादावादी निर्माण झाली या वादावादीचे पर्यवसान धक्काबुक्की आणि हाणामारीमध्ये झालं. अखेर हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला.
दरम्यान, कोकणात कणकवलीत भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झालीय. भर बाजारपेठेत गाड्यांची तोडफोड महाविद्यालयातील तरुणांच्या वादातून प्रकार घडला. कणकवली बाजारपेठेत तणावाचे वातावरण आहे. भाजप नेते संदेश पारकर आणि नगराध्यक्ष समीर नलावडे महाराष्ट्र स्वाभिमान यांचे कार्यकर्ते आहेत.