ZP TEACHER EXAM : मराठवाड्यात सुमारे 10 हजार जिल्हा परिषद शाळा असून, त्यामध्ये 35 हजारांच्या आसपास शिक्षक आहेत. या जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळंच एप्रिल 2023 मध्ये या शाळांची गुणवत्ता चाचणी घेण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतलाय. त्यासाठी गुरुजींनाच परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे.
शिक्षक मूल्यांकनाचा हा प्रयोग सर्वात आधी लातूरमध्ये राबवण्यात आला. आता संपूर्ण मराठवाड्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र मूल्यांकनासाठी शिक्षकांची परीक्षा घेण्यास शिक्षक संघटनांनी मात्र जोरदार विरोध केलाय.
सुरूवातीला जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर विनाअनुदानित आणि महापालिका शाळांमध्येही हाच उपक्रम राबवला जाणार आहे. मात्र या प्रयोगाला होणारा विरोध लक्षात घेता, जिल्हा परिषद प्रशासन विरुद्ध शिक्षक असा सामना रंगण्याची चिन्हं दिसतायत.