जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी गावात गणेश विसर्जनाच्या वेळी दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जनासाठी गेलेली 6 लहान मुले गावातील तळ्यात बुडाल्याचे समोर येतंय. यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आले तर तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालायं.
गावातील तळ्यात गणपती विसर्जन करताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने आणि तळ्यात असलेल्या चिखला मध्ये अडकून बसल्याने या 3 लहान चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.गणेश नारायण चक्कर (8 वर्षे), सुमित सावकार पाबळे (9 वर्षे ), वैभव विलास पाबळे (9 वर्षे ) अशी मृत मुलांची नावे असून या दुर्दैवी घटनेने कावळ पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे.