महिलेवर पतीसमोरच बलात्कार, पुणे पोलिसांनी नराधमाची भरपावसात काढली धिंड

Pune Woman Raped: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती उसने पैसे देऊ शकला नाही यारागातून त्याच्याचसमोर नराधमाने पत्नीवर बलात्कार केला.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 28, 2023, 02:01 PM IST
महिलेवर पतीसमोरच बलात्कार, पुणे पोलिसांनी नराधमाची भरपावसात काढली धिंड title=
Pune Woman Raped at Gunpoint In front of Husband Over money

सागर आव्हाड, झी मीडिया

Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीसमोरच पत्नीवर बलात्कार (Raped On Women) केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर, अमानुष गुन्हा करणाऱ्या या आरोपीला पुणे पोलिसांनी (Pune Police) चांगलाच धडा शिकवला आहे. नराधमाची भरपावसात धिंड काढली आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या या दणक्याची सध्या शहरात एकच चर्चा आहे. (Pune Women Raped On In Front Of Her Husband)

उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने घेणाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक पुण्यातील हडपसर प्रकार परिसरात घडला होता. या गुन्ह्यातील नरधमाची हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली. इम्तियाज हशीम शेख (वय ४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बोपखेल येथील ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. 

मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख याने फिर्यादी महिलेच्या पतीस ४० हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे ते परत करू शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये इम्तियाज याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. 

उसने पैसे परत न केल्याच्या वादातून पतीसमोरच पत्नीवर बलात्कार केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने याच कारणातून तिच्याकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली होती. मात्र यावेळी पीडित महिलेने त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून व व्हिडीओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करत बदनामीचा प्रयत्न केला. 

पीडितेने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत भरपावसात शहरात त्याची धिंड काढली आहे. पुणे पोलिसांच्या या कृतीचे स्वागत होत आहे. तर, अशा नराधमांना असेच समाजासमोर आणून त्यांचा चेहरा उघड करावा, असे मतही व्यक्त होत आहे.