पुणे : सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बंद झालेली पुणे शहरातली वाईन शॉप्स आणि परमिट रूम सुरू होणार आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यातले राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग डीक्लासीफाईड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
तसं पत्र महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं आहे. त्यावर लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्ते डीक्लासिफाय करण्याचा निर्णय घेईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पुण्यातील चारशेपेक्षा जास्त वाईन शॉप आणि परमीट रूम बंद आहेत. कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि बंड गार्डन रस्ता अशा शहरातल्या मध्यवर्ती भागांचाही समावेश आहे.