पुणे विद्यापीठाच्या पेपरफुटीचं ग्रहण सुटता सुटेना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षेला लागलेलं पेपरफुटीचं ग्रहण सुटता सुटत नाही आहे. नुकतेच या विद्यापीठातल्या इंजिनियरींगच्या सर्व शाखांचे पेपर व्हायरल झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता मात्र पेपर व्हायरल करुन त्याची कॉपी केली जात असल्याचं पुढे आलं आहे.

Updated: May 28, 2017, 09:41 AM IST
पुणे विद्यापीठाच्या पेपरफुटीचं ग्रहण सुटता सुटेना title=

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षेला लागलेलं पेपरफुटीचं ग्रहण सुटता सुटत नाही आहे. नुकतेच या विद्यापीठातल्या इंजिनियरींगच्या सर्व शाखांचे पेपर व्हायरल झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता मात्र पेपर व्हायरल करुन त्याची कॉपी केली जात असल्याचं पुढे आलं आहे.

शुक्रवारी मेकॅनिकल इंजिनियरींगच्या दुस-या वर्षाच्या पेपर दरम्यान हा प्रकार उघड झाला. यामध्ये विद्यार्थ्यांकडे वर्गातच प्रश्नांची उत्तरं असणा-या पानांची झेरॉक्स, प्रश्न क्रमांक आणि उत्तरासह अढळून आल्या. त्यामुळे हा पेपर व्हॉट्सऍपवरून फुटल्याचा आरोप होतोय.

विद्यापीठानं  मात्र हा प्रकार पेपरफुटीचा नसून कॉपीचा असल्याचं म्हंटलंय. परिक्षा सुरु होण्याच्या अवघ्या काही मिनिटं आधीच प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना मेल केली जाते. त्यामुळे पेपरफुटीची शक्यता विद्यापीठानं नाकारलीय. मग विद्यार्थ्यांकडे मिळालेल्या झेरॉक्समध्ये परीक्षेतलीच प्रश्न-उत्तरं कशी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.