पुणे: कोरेगाव भीमा दंगल आणि जाळपोळ प्रकरणी पुणे पोलिसांनी छापासत्र सुरूच ठेवले आहे. दरम्यान, पोलिसांनी या छापासत्राची व्याप्ती वाढवत ती राज्याबाहेरही पोहोचवली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी नुकतेच झारखंड, दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणात छापे टाकले. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय नव्याने चर्चेत आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आनंद तेलतुंबडेच्या गोव्यातल्या घरावरही छापा टाकला. तसेच, अरूण फरेरा, सुसान अब्राहम, व्हेरनॉन गोन्झालविझ यांच्या महाराष्ट्रातल्या घरांवरही छापे टाकण्यात आले. या छाप्यात काही लॅपटॉप, फोन, पुस्तकं जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.