पुण्यात घरफोडीसाठी चक्क विमानाने येणारे चोर अटकेत

 आंतरराज्यातील टोळीचा सुगावा 

Updated: Feb 14, 2019, 07:19 PM IST
पुण्यात घरफोडीसाठी चक्क विमानाने येणारे चोर अटकेत title=

पुणे : पुण्यात घरफोडी करण्यासाठी चोर चक्क विमानानं येत असल्याचं उघडकीस आलं आहे. कोंढव्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आंतरराज्यातील टोळीचा सुगावा लागला. या टोळीतील मुख्य आरोपी विमानाने तर इतर आरोपी रेल्वेने पुण्यात यायचे. पुण्यात आल्यावर फिरण्यासाठी ते रिक्षाचा वापर करत असत. ज्या इमारतीमध्ये किंवा परिसरात सुरक्षारक्षक नाहीत अशा ठिकाणी घरफोडी करुन आरोपी पुन्हा विमानाने आणि रेल्वेने परत जात असतं असं तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशातून विमानाने येणाऱ्या मोहम्मद अन्सारी, नफासत अन्सारी या मुख्य आरोपींसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ४ लाख ६८ हजारांचा माल जप्त करण्यात आलं आहे.