पोलिसांकडून कुख्यात गुंड शरद मोहोळ याला अटक

पोलिसांकडून कुख्यात गुंड शरद मोहोळ याला अटक 

Updated: Feb 17, 2021, 03:10 PM IST
पोलिसांकडून कुख्यात गुंड शरद मोहोळ याला अटक  title=

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळला (goon Sharad Mohol) पोलिसांनी अटक केलीय. जेलमधून सुटल्यावर जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावून गर्दी जमवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. पुराव्यांअभावी त्याची सुटका झालीय. त्यानंतर तो तुरुंगाबाहेर आलाय. मात्र एका कार्यक्रमात त्याने गर्दी जमा केली. आज दुपारी त्याला कोर्टात हजर केलं जाईल. 

गुंड शरद हिरामण मोहोळच्यासोबत विश्वास बाजीराव मनेरे, मनोज चंद्रकांत पवार स्वप्निल अरुण नाईक यांना खडकी पोलिसांनी अटक केली. 

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद मोहोळ हा कातिल सिद्दीकी खुनातला आरोपी आहे. येरवडा कारागृहातून शिक्षा पूर्ण करुन सुटल्यानंतर २६ जानेवारीला एका संघटनेच्या पुरस्कार समारंभाला उपस्थित होता.

यावेळी त्याच्यासोबत मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांचा लवाजमा होता. त्यांनी शरद मोहोळच्या नावे जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.