दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार 

Updated: Feb 17, 2021, 09:46 AM IST
दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार title=

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Crime) जवळच्या पळशी शिवारात पतीने पत्नीची निर्घृण हत्या (Husband Murdered His Wife) केल्याची घटना घडली. किरकोळ वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  धक्कादायक म्हणजे पती सिद्धेशने दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने (Iron rod) वार केला आणि नंतर डोक्यात दगड घातला.

आरोपी सिद्धेश हत्येनंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवत लोखंडी जाळीचे दार लावून फरार झाला. दोन्ही चिमुकल्या मुली रात्रभर मृत आईच्या शेजारी होत्या. 

छोटी त्रिशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला बिलगून झोपली होती.  दुसऱ्या दिवशीही मुलं घरात खेळत राहिली. मात्र नंतर भुकेने व्याकुळ झाल्याने मुलं रडू लागली तेव्हा शेजाऱ्यांना ही घटना कळली.