धक्कादायक! पुण्यातील मंडळाच्या देखाव्याला लागली आग, जे पी नड्डा थोडक्यात वाचले; पाहा Video

Pune Fire News : पुण्यातील साने गुरुजी तरुण मित्र मंडळाच्या गणपतीच्या देखाव्याला (Ganpati Mandal pendol Fire) आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Sep 26, 2023, 09:51 PM IST
धक्कादायक! पुण्यातील मंडळाच्या देखाव्याला लागली आग, जे पी नड्डा थोडक्यात वाचले; पाहा Video title=
Pune Fire Ganpati Mandal pendol News J P Nadda

Pune Ganpati Mandal pendol  Fire :  संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव (Pune Ganpati) साजरा केला जात आहे. पुण्यात गणपती पाहण्यासाठी मोठी क्रेझ असते. मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक पुण्यात येतात. अशातच आता पुण्यातून धक्कादायक (Pune News) माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका गणपती मंडळाच्या (Sane Guruji Tarun Mitra Mandal) देखाव्याला आग लागली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) थोडक्यात वाचले आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जे पी नड्डा थोडक्यात वाचले

साने गुरुजी तरुण मंडळाच्या मांडवात (Sane Guruji Tarun Mitra Mandal) आग लागल्याचं समोर येताच पुणे हादरल्याचं समोर आलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी आले असतानाची घटना घडली आहे. साने गुरुजी तरुण मंडळाने महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. याच देखाव्याच्या कळसाला आग लागल्याचं समोर आलंय. त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागलं. पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली अन् मोठी दुर्घटना टळली आहे.

आग कशामुळे लागली?

आग नेमकी कशामुळे लागली? याची पुष्टी अद्याप झाली नाही. मात्र, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडीओमध्ये गणपतीच्या स्टेजला आणि मंदिराप्रमाणे उभारलेल्या सजावटीला आग लागल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये बाजूला फटाके फोडले गेल्याचं देखील दिसतंय. त्यामुळे फटाक्यांमुळे ही आग लागली नाही ना? असा सवाल देखील विचारला जातोय.

आणखी वाचा -  वाशिम येथील तारांगण सुरू होण्याच्याआधीच आगीत जळून खाक; भर पावसात आग लागली कशी?

दरम्यान, पुण्यामध्ये गेल्या अर्धा पाऊण तासपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी आलंय. वाहतुकीवर परिणाम झालाय. काम आटोपून घरी निघालेले पुणेकर मध्येच अडकले आहेत. त्याचप्रमाणे गणपती पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या उत्साहावर शब्दशा पाणी पडलंय.