सागर आव्हाड, झी मीडिया
Pune Crime News: पुण्यातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती हाती लागली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर चोरट्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा कबुलीजबाब ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.
मनीष जीवनलाल राय असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. त्याचबरोबर चोरीस गेलेले सर्व ५५ तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहेत. एका बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. अशी तक्रार पोलिसांच्या हाती आली होती. मात्र या प्रकरणात कोणताच सुगावा लागत नव्हता. अखेर एक एक धागा पकडत व तांत्रिक विश्लेषण करत मनीष रायला पोलिसांनी अटक केली आहे. तो मुळचा मध्यप्रदेशच्या कटणी येथील आहे.
अधिक माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून कबुलीजबाब घेतला. त्याचा जबाब आणि चोरी करण्याचे कारण समोर आल्यानंतर पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आगे. आरोपीला मोबाईलवर ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्याची सवय आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो सतत पैसे जुगारात हारत होता. पैसे पुन्हा मिळवण्यासाठी आणि तीन पत्तीत आणखी पैसे लावण्यासाठी त्याने चोरी करण्याचे ठरवले. जुगारात पैसे हरल्यामुळे त्याने घरफोडी केली. बंगल्यातून त्याने 38 लाखांचा मुद्देमाल चोरला. मात्र, घरफोडीत चोरलेले सर्व ११ लाख रुपयेही तो जुगारात हारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत, घरात ठेवलेले दागिने आणि पैसे चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी तपास सुरू करुन आरोपीला अटक केली. आरोपी हा तो घरातीलच नोकर होता. त्याला जुगार खेळण्याची सवय होती. त्यामुळं तो वेळोवेळी घरातून दागिने आणि पैसे चोरायचा. आत्तापर्यंत आरोपीने 23 लाख रुपये ऑनलाइन जुगारात हारले आहेत.