पुणे हादरलं! अल्पवयीन मुलींची घरात रंगली दारू पार्टी, त्यानंतर घडलं भयानक... एकीचा मृत्यू

Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलींनी दारु पार्टी केली. पण त्यानंतर एका तरुणाचा घरातच गळफास घेतलेल्या अपस्थेत मृतदेह आढळला. या घटनेने पुण्यातली येरवडा भागात खळबळ उडाली आहे. 

Updated: Jul 16, 2024, 06:14 PM IST
पुणे हादरलं! अल्पवयीन मुलींची घरात रंगली दारू पार्टी, त्यानंतर घडलं भयानक... एकीचा मृत्यू title=
प्रातिनिधिक फोटो

Pune : पुण्यातल्या येरवडा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलींनी दारु पार्टी केली. पण त्यानंतर एका तरुणाचा घरातच गळफास घेतलेल्या अपस्थेत मृतदेह आढळला. यामुलीने नशेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरी मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणीही येरवडा (Yerwada) भागात राहायची आणि इयत्ता अकरावीत शिकत होती. सोमवारी संध्याकाळी मृत तरुणीची आई काही कामानिमित्ताने घराबाहेर गेली. ही संधी साधत मृत तरुणी आणि तिच्या एका मैत्रिणीने घरात दारू पार्टी (Alcohol Party) करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्या दारू प्यायल्या. 

या दरम्यान, मृत तरुणीच्या मैत्रिणीने त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाला रात्री 8 वाजता घरी बोलावलं. पण तो तरुण घरी पोहोचताच त्याला एक तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी याची माहिती तात्काळ मृत तरुणीच्या आईला दिली. त्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. तर मृत तरुणीची मैत्रीण बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्या तरुणीलाही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

घटनेनंतर पोलिसांनी घराची पाहाणी केली असता घरात दारुच्या बाटल्या आढळल्या. तर दारू पार्टीनंतर त्यंनी उलट्या केल्याचंही दिसत होतं. त्या तरुणीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. ससून रुग्णालयात उपचार सुरु असलेली मैत्रीण शुद्धीवर आल्यानंतर खरी माहिती कळेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी पाहणी केली असता या दोघींनी दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या देखील केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या तरुणीने आत्महत्या कांकेली हे अद्याप समजू शकलेले नाही