Pune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका

Eknath Shinde : फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका (Municipality) ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. 

Updated: Dec 7, 2022, 12:36 AM IST
Pune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका title=
Pune News Chief Minister Eknath Shinde

Pune News: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी (Fursungi) आणि उरुळी देवाची (Uruli Devachi) या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी यावेळी व्यक्त केला. 

फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका (Municipality) ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणं अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलंय. 

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare), नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी (Bhushan Gagrani), पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar), पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

आणखी वाचा - महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी तरीही पवार बेळगावात पोहोचले होते, लढवलेली खास शक्कल!

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासाठी उपस्थित फुरसुंगी आणि ऊरळी देवाची येथील नागरिकांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच पुणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य दिले जाईल असं आश्वास देखील दिलंय. पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे.