पुणे हादरलं! 6 दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकलं

बाळाच्या आईला आणि मोठ्या मुलीला कारमध्ये लॉक केलं, आणि आईच्या मांडीवर झोपलेल्या बाळाला त्याने खेचलं

Updated: Feb 12, 2022, 05:42 PM IST
पुणे हादरलं! 6 दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकलं title=

पुणे : पुण्यातल्या घोटवडेमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 6 दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  पुणे पोलीस ट्रेकर्सच्या मदतीने बाळाचा शोध घेतला जात आहे. 

नेमकी घटना काय?
बाळाची आई पुण्यातील घोटवडे भागात गोडांबेवाडी गावात मजुरी करते. तिच्या पतीचं निधन झालं असून पहिल्या पतीपासून तिला एक मुलगी आहे. गोडांबेवाडीत काम करताना महिलेचे आपल्याच चुलत भावाशी अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. या संबंधातून महिलेने मुलाला जन्म दिला. पण गोष्ट तिच्या कुटुंबाला सहन झाली नाही.

महिला आणि तिचं कुटुंब हे मुळचं रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. पाच तारखेला तिच्या चुलत भावाने रत्नागिरीत गावाला जायचं आहे सांगून तिला कारने घेऊन गेला. पण ताम्हीणी घाटातील दरी पुलाजवळ गाडी येताच ज्या चुलत भावापासून बाळ झालं त्यानेच बाळाला खेचून घेतलं आणि दरीत फेकून दिलं. 

यावेळी त्याने बाळाची आई आणि तिच्या मोठ्या मुलीला कारमध्ये लॉक करुन ठेवलं होतं. घोटवड्याला परतल्यानंतर महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस आता बाळाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.