पुणे-कर्जत पॅंसेंजर पनवेलपर्यंत तर वसई - दिवा पेणपर्यंत, मेमू गाडी रोह्यापर्यंत

मध्य रेल्वेवर नाशिकमार्गे राजधानी एक्स्प्रेस, पेणपर्यंत असणारी मेमू गाडी रोह्यापर्यंत यासह मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अनेक सुविधांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  

Updated: Jan 18, 2019, 09:35 PM IST
पुणे-कर्जत पॅंसेंजर पनवेलपर्यंत तर वसई - दिवा पेणपर्यंत, मेमू गाडी रोह्यापर्यंत title=

मुंबई : मध्य रेल्वेवर नाशिकमार्गे राजधानी एक्स्प्रेस, पेणपर्यंत असणारी मेमू गाडी रोह्यापर्यंत यासह मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अनेक सुविधांचे उद्घाटन शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, वसई रोड-दिवा-पनवेल-पेण या दरम्यान मेमूच्या आठ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. आता पेणपर्यंत असणारी हीच गाडी शनिवारपासून रोह्यापर्यत धावेल. तसेच पुणे-कर्जत पॅंसेंजर गाडीही पनवेलपर्यंत चालवण्यात येईल. 

 राजधानी गाडीला उद्या हिरवा झेंडा

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण, नाशिक, भुसावळमार्गे जाणाऱ्या राजधानी गाडीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. याशिवाय मध्य रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण रोह्यापर्यंत पूर्ण झाल्याने वीजेवर धावणारी मेमू गाडी रोहापर्यत धावण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. सध्या मध्य रेल्वेवर वसई रोड-दिवा-पनवेल-पेण या दरम्यान मेमूच्या आठ फेऱ्या असून आता पेणपर्यंत असणारी हीच गाडी शनिवारपासून रोह्यापर्यत धावेल. तसेच पुणे-कर्जत पॅंसेंजर गाडीही पनवेलपर्यत चालवण्यात येईल. 

रेल्वेच्या विविध सुविधा

याशिवाय  मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट सोलार पॅनल यासह अन्य काही सुविधाही सेवेत येतील. यात प्रामुख्याने पश्चिम रेल्वेच्या स्थानकातील आठ पादचारी पुल आणि पनवेल येथील दोन सरकते जिन्यांचा समावेश आहे.