कचऱ्यापासून साकारलेले कपडे घालून मॉडेल्सचा रॅम्पवॉक

पुण्यात एका अनोख्या फॅशन शोचं आयोजन कऱण्यात आलं होतं.

Updated: Dec 1, 2019, 03:44 PM IST
कचऱ्यापासून साकारलेले कपडे घालून मॉडेल्सचा रॅम्पवॉक title=

पुणे : आजच्या दिवसांमध्ये ग्लॅमरस लूकला अधिक प्राधान्य दिलं जात. नेहमी नव्या स्टायल मार्केटमध्ये ट्रेंड होत असतात. हेच ट्रेंड आता प्रत्येक जण फॉलो करताना दिसतो. आताच्या धकाधकीच्या जीवनातही फॅशनला विशेष प्राधान्य दिले जाते. पुण्यात नुकताच झालेल्या एका फॅशन शोमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ या कल्पनेच्या अधारावर एकापेक्षा एक ड्रेस डिझाइन केले.   

पुण्यात एका अनोख्या फॅशन शोचं आयोजन कऱण्यात आलं होतं. या फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सनी चक्क कचऱ्यापासून बनवलेले पोशाख परिधान करत रॅम्पवॉक केला. माय अर्थ फाऊंडेशनतर्फे हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. 

पर्यावरण विषयक जागृती हा त्यामागील उद्देश होता. प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आलाय. 

प्लास्टिकचा वाढता वापर सृष्टीसाठी घातक आहे. त्यामुळे सरकार या गंभीर विषयावर अनेक योजना राबवत आहे. कचरा ही आपली संपत्ती आहे आणि त्यापासून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. असे वक्तव्य फाउंडेशनचे आयोजक अनंत घरत यांनी केलं आहे.