Ajit Pawar On Sharad Mohol Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी (Sharad Mohol Murder Case) पोलिसांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर 3 पिस्तुलं जप्त केल्यात. नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा या हत्येचा मास्टरमाईंड असून त्यानेच प्लॅन करुन भाच्याला मोहोळ टोळीत घुसवलं होतं. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (Munna Polekar) गेल्या महिन्याभरापासून शरद मोहोळच्या टोळीत काम करत होता. मात्र संधी मिळतात पोळेकरने शरद मोहोळचा गेम केला. शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणामुळे सध्या पुण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना या प्रकरणावर भाष्य केलं. पुण्यात काल एक घटना घडली होती. पण पोलिसांनी ताबोडतोब जे कुणी दोषी होते त्यापैकी अनेकांना पकडण्यात आलंय. पोलिसांनी दोन-तीन तासांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन याची सविस्तर माहिती दिलीये. पोलिसांचा पुढचा तपास सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. काल पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या झाली, त्यातील गुन्हेगारांना तातडीनं अटक करण्यात आली. त्याची कारणं ही समोर आलेली आहेत. पुण्यातील सर्व घडामोडींकडे पालकमंत्री म्हणून बारकाईने लक्ष आहे. संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मील त्याबद्दल बोलणं उचित नाही, मी एवढंच तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या संदर्भात जी काही वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर आणली जाईल, असं आश्वालन अजित पवार यांनी पुणेकरांना दिलं आहे.
दरम्यान, पैशांच्या देवाणघेवाणीतून आरोपी आणि शरद मोहोळ यांच्यात खटके उडाल्याचंही समोर आलंय. मुठा खोऱ्यातील 10 वर्षांपासूनच्या वर्चस्वातील संघर्षातून ही हत्या झाल्याचं कळतंय. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल होते.