Pune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 21, 2024, 10:00 AM IST
Pune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई title=

Pune Police also raided Delhi News In Marathi : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. आधी दहशतवाद्यांच्या रडारवर, कोयता गॅंग अधूनमधून सक्रीय, मोकोकासारखी पोलिसांची कारावाई केली. अशा गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांचे जोरदार प्रयत्न सुरु असताना पुणे शहरात मिळणारे अंमलीपदार्थ हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. पुण्यात पुन्हा एकदा मोठा साठा मिळाला आहे. आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्ली कनेक्शन समोर आलं  आहे. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई करत मंगळवारी (20 फेब्रुवारी) दिल्लीतून तब्बल 1800 कोटींतं ड्रग्स जप्त केलयं आहे. आतापर्यंत अवघ्या 3 दिवसात पुणे पोलिसांनी 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एम डी ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने काही तस्करांना अटक देखील केली आहे. पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

 पुण्यातील ड्रग्स  प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम आणि ब्राऊन नावाच्या तस्करांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुणे पोलिसांनी शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश सुरू केला आहे. गुन्हे शाखेच्या शाखांनी पुणे, कुरकुंभ आणि दिल्ली येथेही छापे टाकले आहेत. या छाप्यात पोलिसांनी अवघ्या 3 दिवसांत 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. दिल्ली क्राईम ब्रँचने टाकलेल्या पहिल्या छाप्यात 600 किलो ड्रग्ज सापडले होते तर दुसऱ्या छाप्यात 1200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. 

आतापर्यंत पुणे पोलिसांची कारवाई

फेब्रुवारी 18 : सोमवार पेठेतील छापेमारी मध्ये 2 किलो एम डी जप्त

फेब्रुवारी 19 : विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो एम डी जप्त

फेब्रुवारी 20 : कुरकुंभ एम आय डी सी मधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचे ड्रग्स आले आढळून

फेब्रुवारी 20 : पुणे पोलिसांची थेट दिल्लीत कारवाई. 800 कोटी रुपयांचे 400 किलो एम डी केले हस्तगत

फेब्रुवारी 21 : पुणे पोलिसांच्या आणखी एका कारवाई मध्ये दिल्लीत मिळून आले 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो एम डी