पुण्यात API चा डर्टी पिक्चर, महिलेच्या 5 वर्षांच्या मुलासमोर शारीरिक-मानसिक शोषण

पुण्यात API चा डर्टी पिक्चर, 5 वर्षांच्या मुलासमोर महिला PSI चा शारीरिक-मानसिक शोषण

Updated: Oct 29, 2021, 09:18 PM IST
पुण्यात API चा डर्टी पिक्चर, महिलेच्या 5 वर्षांच्या मुलासमोर शारीरिक-मानसिक शोषण title=

पुणे: संरक्षण करणाऱ्या खादी वर्दीतील एक विकृत चेहरा समोर आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकाने पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याचं सांगून आपल्याच क्षेत्रातील महिला पोलीस उपनिरीक्षकाशी लग्न केलं. इतकच नाही तर लग्नानंतर या महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याशिवाय फसवणूक केली ती वेगळी. हे जेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं, त्यावेळी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 

पीडित महिला नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील आहे. आरोपी सहायक पोलीस निरीक्षक हरीष सुभाष ठाकूर याने महिलेला पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याचं खोटं सांगितलं. त्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न केलं. मात्र रजिस्टर कऱण्यास वारंवार टाळाटाळ करू लागला. आरोपी जबरदस्ती आणि अनैसर्गित पद्धतीने महिलेचं लैंगिक शोषण करत होता. 

2013 पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता. 2015 मध्ये जेव्हा फिर्यादी महिला या सगळ्याविरोधात आवाज उठवणार होती. तेव्हा तिला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपी सहायक पोलीस निरीक्षकाने फिर्यादी महिलेशी 5 वर्षांच्या मुलासमोर देखील लैंगिक शोषण करणं सोडलं नाही. अखेर पीडितेनं न्याय मागण्यासाठी पोलिसात धाव घेतली. 

 वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार पीडित महिलेनं दिली आहे. फिर्यादी महिला या पुण्यातच पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार आरोपीने तिच्यावर गोळी झाडून जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यावेळी फिर्यादीच्या बोटाला लागून जखमी झाल्या होत्या. 

आरोपीच्या दबावामुळे तक्रार दाखल करण्यासाठी फिर्यादी पुढे येत नव्हती. मात्र अखेर खडकी पोलिसांकडे न्यायसाठी त्यांनी धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.