पुणे : भाजपमधील पक्षांतर्गत सुंदोपसुंदी, महापालिकेतील गटबाजी आणि त्यातच नेत्यांकडून येणारी वादग्रस्त वक्तव्य अशा गर्तेत पुणे शहर भाजप सापडलंय.
या पार्शवभूमीवर पुण्यातले अनिल शिरोळे आणि संजय काकडे या दोन खासदारांत नुकतीच एक प्रदीर्घ भेट झाली. ही भेट म्हणजे पुणे शहरातल्या बदलत्या राजकारणाची नांदी असल्याची चर्चा यानिमित्तानं सुरु झाली आहे.