पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष निर्माण झाल्याचे पहायाल मिळत आहे. या संघर्षाने इतके टोक गाठले आहे की, दोन्ही नेत्यांनी महापालिकांतर्गत येणाऱ्या नागरी समस्यांचा आढावा घेणाऱ्या बैठकीचे आयोजनही वेगवेगळे केले आहे. बापट यांनी आयोजित केलेल्या बैठकीत विवीध योजनांच्या कामाबाबत आढावा घेतला. तर, गोगावले यांनी वॉर्डनिहाय समस्यांबाबत नागरिक आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. एकाच मुद्द्यावर घेतलेल्या दोन वेगवेगळ्या बैठका या पुणे जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, बापट यांनी या बैठकीत २० प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यात रस्ते, फ्लायओव्हर, शहरसौदर्य, पाणीपुरवठा, लोहगाव विमानतळाकडे जाणारा रस्ता अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
दरम्यान, गोगावले यांनी घेतलेल्या बैठकीत शहर विकास, पावसाळ्यापूर्वी शहरातील स्वच्छता, रस्त्यांच्या समस्या, बेकायदेशिरपणे केली जाणारी रसत्यांची खुदाई, आदी गोष्टींवर चर्चा केली. दरम्यान, बापट आणि गोगावले यांनी वेगवेगळ्या आयोजित केलेल्या बैठकीत समान मुद्देच चर्चेत आले. त्यामुळे वेगवेगळ्या बैठका आयोजित करण्याचे कारण काय? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.