पुण्यात या विद्यापीठातील महिला डॉक्टर्सच्या बाथरुम, बेडरुममध्ये छुपे कॅमेरे

डॉक्टरमहिला घरी आल्यावर तिने बाथरुममधील बल्ब लावला पण तो लागला नाही, बल्बही काही वेगळाच

Updated: Jul 8, 2021, 06:13 PM IST
पुण्यात या विद्यापीठातील महिला डॉक्टर्सच्या बाथरुम, बेडरुममध्ये छुपे कॅमेरे title=

पुणे  : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या भारती विद्यापीठात महिला डॉक्टर्सच्या क्वार्टर्समध्ये स्पायकॅम सापडलेत. बेडरूम तसंच बाथरूममध्ये कॅमेरे सापडल्यामुळे गोंधळ उडालाय. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न हॉस्पिटलमधील एका 31 वर्षीय महिला डॉक्टरनं याबाबत तक्रार दिली आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

तक्रारदार महिला डॉक्टर कॅम्पसमधील क्वार्टर्समध्ये राहते. 6 जुलै रोजी संध्याकाळी आपली बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचं आढळून आल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय.

विशेष म्हणजे या इमारतीच्या बाहेर सीसीटीव्ही नाहीत, पण क्वार्टर्सच्या आत कुणीतरी छुपे कॅमेरे लावलेले आहेत. या छुप्या कॅमेऱ्यांचं नेमकं कनेक्शन कुठे आहे, हे पोलीस तपासातच समोर येणार आहे. मात्र भारती विद्यापीठाच्या या घटनेनं सर्वांना धक्का दिला आहे.

डॉक्टरमहिला घरी आल्यावर तिने बाथरुममधील बल्ब लावला पण तो लागला नाही, बल्बही काही वेगळाच दिसत होता, तेव्हा या डॉक्टरने इलेक्ट्रीशियनला बोलवलं, पण तो म्हणाला की हा तर छुपा कॅमेरा आहे, असाच छुपा कॅमेरा बेडरुममध्येही दिसून आला आहे.