पुणे : खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद ( Khadki Cantonment corporator Manish Anand) यांच्यासह सात जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case of murder and molestation has been registered ) माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मारहाण प्रकरणात (Assault case of former MLA Harshvardhan Jadhav) आता न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असणाऱ्या 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, मजय चड्डा, मनीष आनंद, मोटारसायकलवर असलेले दोन अनोळखी व्यक्ती आणि गर्दीत असणारा एक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार,14 डिसेंबर रोजी औंध येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे कार पार्क केली होती. त्यावेळी त्यांनी कारचा दरवाजा उघडला असता पाठीमागून जाणूनबुजून ममता चड्डा आणि वजय चड्डा यांनी धडक देऊन आरडाओरडा केला. त्यांना शिवीगाळ करत फिर्यादी यांना स्पर्श करत विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार झाल्यानंतर फिर्यादी हे तेथून त्यांचे सहकारी हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत औंध चौकात आले असता आरोपींनी त्यांची कार दुचाकी आडवी लावून थांबवली. तसेच जाधव यांना खाली ओडून मारहाण करत शिवीगाळ केली. त्यांना रॉडने बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे.
तर फिर्यादी यांना आरोपींनी या गोंधळात घेऊन कारमध्ये बसवले तसेच आरोपी मनीष आनंद आणि अमन आणि करण यांनी त्यांच्यावर गाडीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना मारहाण करून त्यांचा आयफोन तोडला. कारचे नुकसान केले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम हर्षवर्धन जाधव आणि फिर्यादी यांच्यावर जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी तक्रार केली होती.
मात्र त्यात पोलिसांनी कारवाई केली नाही. यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आता गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. यामध्ये खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.