औरंगाबादेतील दुष्काळ आढावा बैठकीत प्रशासनाची पोलखोल

आढावा बैठक फक्त आणि फक्त गोंधळ. 

Updated: May 7, 2019, 07:43 PM IST
औरंगाबादेतील दुष्काळ आढावा बैठकीत प्रशासनाची पोलखोल title=

औरंगाबाद : औरंगाबादेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुष्काळ आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाचा दुष्काळाबाबत गोंधळ सुरु आहे याची चांगलीच पोलखोल झाली. मंत्र्य़ांनी, बैठकीला उपस्थित आमदारांनी अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. गेली दोन दिवस औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादेत दुष्काळ परिस्थितीची पाहणी करत आहेत. या पाहणीत अनेक तक्रारी त्यांना मिळाल्या, त्याच आधारावर त्यांनी आढावा बैठक घेतली आणि त्यात समोर आला तो फक्त आणि फक्त गोंधळ. 

भोंगळ कारभारामुळे अगदी बैठकीत मंत्र्यांना अधिका-यांवर चिडण्याची वेळ आली मात्र अधिकारी निर्विकार चेह-यांनी पाहत असल्याचं दुर्दैवी चित्र दिसलं. मंत्र्यांच्या सरबत्तीवर अधिकारी निरूत्तर होते.

चारा छावणीवर चा-याचा तुटवडा आहे. त्यांना पुरवठा कोठून करणार, गुरांना पूर्णचारा सुद्धा मिळत नाही. यावर बोलतांना अधिकारी चारा आणायची जबाबदारी चारा छावणी मालकाची आहे, असं सांगत आहे आणि हात झटकताय.

चारा छावण्या उघडल्या त्याचे पैसै मिळत नाही?. या प्र्श्नावर सुद्धा अधिका-यांनी हे काम आमचे नाही याचे आहे त्याचे आहे म्हणून टोलवा टोलवी केली.

चारा छावण्यांचे प्रस्ताव पेंडीग आहेत त्याबाबत काय सुरु आहे. या प्रश्नावर अधिकारी म्हणतात की, सक्षम संस्थाच मिळाल्या नाही. मग चाऱ्याविना जनावरं मरू द्यायचे का असं विचारल्यावर अधिकारी निरूत्तर झाले.

तलाठी ग्रामसेवकसारखे अधिकारी अजूनही गावात उपलब्ध नसल्याचं वास्तव समोर आलं. पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव पडून आहेत. छावण्याचे प्रस्ताव पडून आहे. मात्र अजूनपर्यंत त्यावर निर्णय झाला नाही. अधिकारी निर्णय लवकरच घेणार असं सांगत आहेत.

एक टँकर किती फे-या मारते आणि टँकर गावात पोहोचतात का या प्रश्नावर सुद्धा अधिकारी निरूत्तर झाले. रोजगार हमी योजनांची अनेक काम सुरु झाली नाही, अनेक ठिकाणी पैसै मिळत नाही यावरही अधिकारी निरुत्तर होते.

पिक विमा मिळाला नाही यातही घोळ होतो यावरही अधिका-यांकडे उत्तर नव्हतं. धक्कादायक म्हणजे धरणांचा गाळ काढणं सुरु आहे का य़ासाठी यंत्रणा काम करते का या प्रश्नावरही एकही अधिकारी उत्तर देवू शकला नाही. प्रशासनाची ही निरुत्तरता म्हणजे औरंगाबादेत दुष्काळाची काम सुरु आहेत की नाही असाच प्रश्न उभा राहिला आहे.