खासगी बसला अपघात, ४ ठार ४० जण जखमी

शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला मुंबई - आग्रा महामार्गावर संध्याकाळी ६ वाजन्याच्या दरम्यान इगतपुरीत अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत.  

Updated: Dec 8, 2018, 09:31 PM IST
खासगी बसला अपघात, ४ ठार ४० जण जखमी title=

नाशिक : शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला मुंबई - आग्रा महामार्गावर संध्याकाळी ६ वाजन्याच्या दरम्यान इगतपुरीत अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये दिल्ली, मुंबई येथील प्रवासी असल्याचे समजते. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत झाली.

शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला इगतपुरी तालुक्यातील गोंदे - पाडळी जवळ महामार्गावर हा अपघात झाला. बसचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

शिर्डी येथून साईबाबा दर्शन करून ५० प्रवासी क्षमतेची लक्झरी बस नाशिकडून मुंबईकडे जात होती. वेगावर नियंत्रण मिळण्यास बसचालकाला अपयश आल्याने ही बस दुभाजकावर जोरदार आदळली. यानंतर २०० फूट फरफटत ही बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एका प्रवासी महिलेला ६ अपत्यांनंतर साईबाबा यांच्या नवसाने मुलगा झाला होता, असे प्रवाशांनी सांगितलेय. त्या मुलाला नवस पूर्ण करण्यासाठी ही महिला बसने प्रवास करीत होती. या अपघातात या ८ वर्षीय मुलाचाही हृदयद्रावक मृत्यू झाल्याने त्याचा मातेने टोहो फोडला. या टोहोने सर्वजण हेलावून गेले.