घरकामगार आणि वाहन चालकांसाठी पंतप्रधान श्रम मानधन योजना

घर कामगार, खाजगी वाहन चालकांना आधार देण्याचा निर्णय

Updated: Apr 12, 2020, 04:05 PM IST
घरकामगार आणि वाहन चालकांसाठी पंतप्रधान श्रम मानधन योजना  title=

मुंबई : कोरोनाच्या संकट काळात घर कामगार, खाजगी वाहन चालकांना आधार देण्याचा निर्णय राज्याच्या कामगार विभागाने घेतला आहे. या अनुशंगाने घर कामगार आणि खाजगी वाहन चालकांची माहिती राज्य सरकारच्या कामगार विभागाने मागवली आहे. 

घर कामगार आणि वाहन चालकांना पंतप्रधान श्रम मानधन योजनेचा लाभ देण्याचा राज्य कामगार विभागाचा विचार आहे. यासाठी ही माहिती मागवण्यात आली आहे. राज्यातील गृहनिर्माण सोसायटीना जिल्हा उपनिबंधकांकडे ही माहिती मेलद्वारे पाठवणयात येणार आहे.

संबंधित सोसायटीत काम करणार्‍या घर कामगार आणि वाहन चालकांचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, रेशनिंग कार्ड नंबर, जन्म तारीख अशी माहिती सोसायटीच्या माहितीसह जिल्हा उपनिबंधकांना मेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरानाच्या पार्श्वभूमीवर घर कामगार आणि वाहन चालकांचा रोजगार बुडाल्याने त्यांना पंतप्रधान श्रम मानधन योजना सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या कामगार विभागाने घेतला आहे.