पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. द रम्यान, पुणे महापालिकेत येणारे मोदी दुसरे पंतप्रधान आहेत. या आधी 1961 मध्ये पानशेत धरण फुटले होते, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यात आले होते. त्यावेळी ते महापालिकेत आले होते. मोदी यांनी पुणे महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधान पंतप्रधान गरवारे स्टेशनकडे रवाना झालेत. (Prime Minister Modi's welcome in Pune, inauguration of Chhatrapati Shivaji Maharaj statue in Pune Municipal Corporation)
विमानतळावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते. त्यानंतर मोदी हे पुणे महापालिकेच्या दिशेने रवाना झालेत. पंतप्रधान महापालिकेत दाखल झालेत. पुणे पालिकेच्या प्रांगणातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला मोदी यांनी अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले.
MIT स्थळ याठिकाणी मेट्रो प्रदर्शनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मोदी यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी मेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित यांनी माहिती दिली. MIT स्थळ याठिकाणी मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. आणि त्यांनतर मोदी यांनी तिकीट काढले. त्यानंतर त्यांनी मेट्रोतून प्रवास केला.
पहिल्या 3 स्थानकांसाठी 10 रुपये, त्यापुढील स्थनाकांसाठी 20 रुपये तिकीट आहे