PM Modi to Inaugrate Nagpur-Mumbai Samruddhi Expressway : मुंबई आणि नागपूरचं अंतर आता 7 तासांवर येणार आहे कारण समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून आज पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) असं नाव देण्यात आलं आहे. आज मोदी यांच्या हस्ते नागपूर - शिर्डी (Nagpur - Shirdi) या रस्त्याचे लोकापर्ण होणार आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यक्रमस्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.
या महामार्गामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळं जोडण्यास हा महामार्ग उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाची आखणी केलीय. हा महामार्ग नागपूर, मुंबई आणि संभाजीनगर या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल. (Prime Minister Modi inaugurated first phase of Samriddhi Highway or nagpur mumbai expressway today 11 December 2022)
समृद्धी महामार्गाचे एकूण अंतर 701 किमी
नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा एक्स्प्रेस वे लोकांसाठी खुला
उर्वरित मार्ग सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे
प्रकल्पात किमान 10 जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडली जाणार
6 लेनचा महामार्ग, गरज भासल्यास 8 लेनपर्यंत वाढवता येईल
26 टोल टॅक्स काउंटर
अंदाजे खर्च 55000 कोटी इतका
महामार्गावर वैद्यकीय सुविधा
108 क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध
15 रुग्णवाहिका, 15 जलद प्रतिसाद वाहने, 13 गस्ती वाहने तैनात
सकाळी 9.25 - नागपूर विमानतळ आगमन
सकाळी 9.40-- रस्ते मार्गाने रेल्वे स्थानकावर आगमन
सकाळी 9.45 ते 9.55 --वंदे भारत एक्सप्रेस Flagging off
सकाळी 10.00-- फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन येथे आगमन
सकाळी 10.10 -- मेट्रो प्रदर्शनाची पाहणी -आणि मेट्रो सफर
सकाळी 10.20- खापरी मेट्रो स्थानाकावर आगमन
सकाळी10.30-- खापरी मेट्रो स्टेशन. मेट्रोच्या दोन मार्गांचे लोकार्पण
सकाळी 10.45 -- समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर आगमन
सकाळी 10.45 ते 11.00 । समृद्धी महामार्गावर दहा किलोमीटरचा प्रवास व महामार्गाचे लोकार्पण
सकाळी 11- रस्ते मार्गाने मिहानकडे प्रस्थान
सकाळी 11.15 ते 11.25 - मिहान एम्स येथे आगमन व एम्सचे औपचारिक उद्घाटन
सकाळी 11.30 - टेम्पल ग्राउंड एम्स सार्वजनिक कार्यक्रम व नव्या प्रकल्प उद्घाटन
दुपारी 12.35 - नागपूर विमानतळाकडे प्रस्थान
दुपारी 12.55 - नागपुरातून विमानाने गोव्यासाठी प्रस्थान