कोल्हापूरात गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन ठिकाणी घडला प्रकार

Kolhapur News: कोल्हापुर गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या दोन टोळींना पकडण्यात आलं.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 17, 2024, 10:30 AM IST
कोल्हापूरात गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन ठिकाणी घडला प्रकार title=

Kolhapur News: गर्भलिंग निदान करुन स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या टोळीला कोल्हापुरातून पकडलं असून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या म्हाडा कॉलनीतील एका घरात शहर आरोग्य पथक आणि कोल्हापूर पोलीस यांनी संयुक्तपणे घरात छापा टाकुन ही कारवाई केली आहे. 

मुलगा होण्यासाठी एक लाख रुपयांचे औषध देणाऱ्या तसेच रेडा झालेल्या म्हशीचे दूध प्या असे निरनिराळे अवैज्ञानिक उपाय सांगत लोकांची फसवणूक करत स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आला आहे. . यामध्ये एका बोगस डॉक्टरसह तिघांचा समावेश आहे. तर तर संशयीत आरोपी स्वप्नील पाटील (रा. बालिंगा) हा बोगस डॉक्टर कारवाईवेळी पसार झाला असून अजित केरबा डोंगरे (रा. म्हाडा कॉलनी), कृष्णात आनंदा जासूद (रा. निगवे दुमाला) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

कोल्हापुरात ही एकच घटना घडलेली नाही.  मुलगाच हवा असेल तर 1 लाख रुपये घेऊन औषध द्यायचे असा आरोप बोगस डॉक्टर करण्यात आला आहे. वाशी नाका येथील श्री लॉन परिसरातील दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून बोगस डॉक्टर फरार झाला आहे. 
गर्भलिंग चाचणी करून मुलगाच व्हावा यासाठी विविध औषध देण्याच्या लावत होते भूलथापा. 

वाशीनाका म्हाडा कॉलनीतील (Mhada Colony) एका घरात गर्भलिंग चाचणी (Pregnancy Test) करून देऊ, मुलगा होण्यासाठी विविध उपचार करू, अशा भूलथापा लावत सोनोग्राफीद्वारे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान होत होते. त्या घरात जिल्हा, शहर आरोग्य पथक व महिला बाल कल्याण समितीच्या पथकाने छापा टाकत फसवणुकीचा पर्दाफाश केला. यावेळी अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्या वस्तू वितरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासुरकर यांनी स्टिंग ऑपरेशन करत केली होती कारवाईची मागणी.