प्रवीण दरेकर यांना दिलासा, सत्र न्यायालयाने दिले हे निर्देश

मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय.  

Updated: Mar 17, 2022, 04:48 PM IST
प्रवीण दरेकर यांना दिलासा, सत्र न्यायालयाने दिले हे निर्देश title=

मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांनी मजूर वर्गातून निवडणूक लढविली यावर आक्षेप घेण्यात आला आहे. 

मुंबई बँकेची मध्यवर्ती शाखा फोर्ट परिसरात आहे. त्यामुळे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. 

उच्च न्यायालयाने प्रवीण दरेकर यांचा अर्ज फेटाळून लावताना सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती. आज सत्र न्यायालयात याची सुनावणी झाली असता सरकारी वकिल इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्याने सोमवारची वेळ मागण्यात आली.

त्यामुळे सत्र न्यायालयाने ही सुनावणी सोमवारपर्यत पुढे ढकलली आहे. तसेच, सोमवारपर्यंत दरेकर यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.