प्रणव मुखर्जी 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल

  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. 

Updated: Jun 7, 2018, 09:27 AM IST
प्रणव मुखर्जी 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल title=

नागपुर:  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.

असा असेल प्रणवदांचा दिनक्रम 

 नागपूर विमानतळावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं.. आज दिवसभर त्यांचे कुठलेही नियोजित कार्यक्रम नसून राजभवनातच ते  काही लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यात बंगाली असोसिएशनचा समावेश आहे. दुपारी भोजनासाठी ते रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात येणार आहेत. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि तृतीय वर्ष वर्गाच्या प्रशिक्षणार्थींसोबत भोजन घेणार आहेत. दरम्यान, भागवत यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आणि प्रशिक्षणार्थींच्या संचलनाची रंगीत तालीमही पाहिली.शुक्रवारी दुपारी 1 वाजता मुखर्जी दिल्लीला रवाना होतील.. या तीन दिवसीय नागपूर दौऱ्यात संघाचा कार्यक्रम वगळता मुखर्जी यांचा कुठलाही दुसरा कार्यक्रम अजून आलेला नाही.