प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता नाशिक कनेक्शन

Honey Trap Case : पुण्यातील डीआरडीओ अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचले आहे. नाशिकमध्ये कुणी अधिकारी यामध्ये गुंतलेलं आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Updated: May 18, 2023, 12:33 PM IST
प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता नाशिक कनेक्शन  title=

Pradeep Kurulkar Honey Trap Case : पुण्यातील डीआरडीओ अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचले आहे. नाशिकमधीलही दोन अधिकारी या प्रकरणात अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एटीएसने त्यांच्या नाशिक युनिटला दोन मोबाईल क्रमांक पाठवलेत. त्याद्वारे तपास करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प इथं डीआरडीओसारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत. आता नाशिकमध्ये कुणी अधिकारी यामध्ये गुंतलेलं आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

नागपूर कनेक्शन समोर

हनी ट्रॅप प्रकरणात आता नागपूर कनेक्शन समोर आले आहे. डीआरडीओचे अधिकारी डॉक्टर प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचा तपास सुरु असताना वायुसेना कर्मचारी निखिल शेंडे याचं नाव पुढे आले आहे. मूळचा नागपूरचा असलेला निखिल शेंडे हाही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. कुरुलकरला शेंडेच्या मोबाईलवरून मेसेज आल्याचं तपासात उघड झाले आहे. पाकिस्तानी हेर झारा ही निखीलच्या नंबरवरुन कुरुलकरला मेसेज करायची. झाराने निखिलचा नंबर का आणि कसा वापरला याबाबत एटीएसकडून तपास सुरू आहे. मात्र, निखील शेंडेच्या कुटुंबीयांनी आरोप फेटाळत निखील निर्दोष असून त्याला कुणीतरी फसवल्याचा दावा केला आहे.

 कुरुलकर याचे कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचल्याने एटीएसने त्यांच्या नाशिक युनिटला दोन मोबाइल क्रमांक पाठविलेयत, त्याद्वारे तपास करण्याची सूचना केली आहे. यापूर्वी एटीएसने नागपूर येथील मोबाइल क्रमांकाद्वारे तपास केला असता, बंगळुरूुयेथील हवाई दलाच्या अधिकाऱ्याचे प्रकरण समोर आले होते. नाशिकमध्ये देवळाली कॅम्प येथील डीआरडीओ सारख्या महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे आता नाशिक येथील दोन मोबाइलचा वापर कोणाकडून केला जात आहे. पुन्हा देशाच्या संरक्षण खात्यातील कुणी अधिकारी तर नाही ना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पाकिस्तान हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेला डीरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरची आता पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. जर पॉलिग्राफ टेस्टमध्येही कुरुलकरने तोंड उघडलं नाही तर नार्को टेस्ट घेण्याची तयारीसुद्धा एटीएसने केली आहे. कुरुलकरच्या एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो आढळलेत. दुसऱ्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी एजंट झारासोबतचं व्हॉट्स अ‍ॅप चॅट आणि पर्सनल व्हिडिओही आढळला आहे. कुरुलकर एक दोन नाही तर तब्बल चार फोन वापरत होता, हेही पुढे आले आहे.

 पाकिस्तानच्या हनीट्रॅप जाळ्यात अडकून कुरुलकर याने संरक्षण दलाची महत्त्वाची माहिती दिल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी त्याला एटीएसने अटक केली आहे. गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंट यांना पुरविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महासंचालकांच्या परवानगीने एटीएसकडे गुन्हा दाखल केला होता.