प्रगतशील महाराष्ट्रात आरोग्य सुविधेच्या अभावाचे बळी,नवजात जुळ्यांचा आईदेखत अंत

राज्य सरकार, पालघर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Updated: Aug 16, 2022, 10:31 AM IST
प्रगतशील महाराष्ट्रात आरोग्य सुविधेच्या अभावाचे बळी,नवजात जुळ्यांचा आईदेखत अंत title=
poor management of the health department nine month pregnant woman twins die due to lack of road in palghar in marathi

पालघर - आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा दुसरीकडे मन हेलावून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडते आहे. राज्य सरकार, पालघर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका आईला आपल्या दोन तान्हुल्यांना डोळ्यासमोर प्राण सोडताना पाहावे लागले आहे. केवळ आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्यानं एका गर्भवती महिलेच्या जुळ्या मुलांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. (twins die due to lack of road in palghar in marathi)

पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा हा व्हिडीओ पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. मोखाड्याच्या मरकटवाडीत ही घटना घडलीय... मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधल्या मरकटवाडी इथल्या वंदना बुधर या गर्भवती महिलेला प्रसृती वेदना सुरू झाल्या. तत्काळ आरोग्य सेवा मिळणं तर दूरच पण रुग्णालयात जाण्यासाठी इथं तीन किलोमीटर असा डोलीतून पायपीट करावी लागते. वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्यानं या महिलेला डोळ्यासमोर आपल्या दोन चिमुकल्यांचा जीव जाताना पाहण्याची वेळ आली. 

एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे गरोदर मातेची जगण्याची धडपड या व्हिडीओमध्ये दिसते आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली मात्र अजूनही अतिदुर्गम भागात प्राथमिक सोयीसुविधांपासून स्थानिक लोकं वंचित आहेत. आजही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला काहीही सोयरसुतक नसल्याचंच दिसून येतंय. 

गंभीर बाब म्हणजे महिनाभरापूर्वीच याच गावातून एका आजारी वृद्ध महिलेला उपचारासाठी भर पावसात चादर आणि प्लास्टिकची डोली करून रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं होतं. या बाबतची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. मात्र अजूनही प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही.

जर मरकटवाडीलता हा रस्ता झाला असता तर आज या मातेने आपल्या दोन मुलांना गमावलं नसतं. दोन बळी घेतल्यानंतर आता तरी प्रशासन मरकटवाडीच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष देणार का असा सवाल आम्ही प्रशासनाला विचारतोय.