वसईत पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस कर्माच्याऱ्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 11, 2018, 02:27 PM IST
वसईत पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न title=

वसई : पोलीस कर्माच्याऱ्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंठाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा त्यांच्या पत्नीने आरोप केला आहे. एएसआय महेश यशवंत गोसावी वय 50 असं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पोलीस कर्माच्याऱ्याचे नाव आहे. गोसावी यांच्यावर वसईतील सर डी एम पेटिट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बुधवारी रात्री 11 च्या सुमारास गोळ्या खाऊन आत्महत्येचा त्यांनी प्रयत्न केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे प्रभारी एपीआय मारुती पाटील आणि पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या मानसिक जाचाला कंठाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

व्हिडिओ